Skin Care Home Remedies: उन्हाळ्यात धूळ,माती ,प्रदूषण तसेच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे टॅनिंगची समस्या वाढते. सूर्याची किरणे त्वचेला जाळतात आणि त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर दिसून येतो. तसेच उन्हामुळे चेहऱ्यावर धूळ, घाण आणि घामाचा थर साचू लागतो.पण अशावेळी टॅनिंग घालवण्यासाठी आज आपण काही घरगुती फेस पॅक जाणून घेणार आहोत.
एक चमचा बेसन घेऊन त्यात दही मिसळा. ही पेस्ट १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. या फेस पॅकचा परिणाम टॅनिंग दूर करण्यात झपाट्याने दिसून येतो. या फेसपॅकमुळे त्वचेला हायड्रेशनही मिळते.
एका भांड्यात पपई घेऊन मॅश करा. पपईची पेस्ट चेहऱ्याच्या टॅनिंगसाठी तसेच हात आणि पायांची टॅनिंग दूर करण्यासाठी लावता येते. पपई त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे टॅनिंग दूर होते. याशिवाय पिगमेंटेशन, डाग आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यातही पपईचा प्रभाव दिसून येतो.
लाइकोपीन समृद्ध टोमॅटो त्वचेसाठी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतात. टोमॅटोमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकतात. अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशामुळे होणारे त्वचेचे नुकसान दूर करण्यासाठी टोमॅटोचा रस वापरता येतो. तुम्ही टोमॅटो कापून थेट चेहऱ्यावर चोळू शकता किंवा त्याचा लगदा फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावू शकता.
एक वाटी घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे दही आणि चिमूटभर हळद मिक्स करा. त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे ठेवल्यानंतर धुवा. हळद आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्याची शोभा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे आणि आठवड्यातून दोनदा नियमित लावल्यास टॅनिंगपासून सुटका मिळते.
( वरील बातमीत देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









