Summer Teeth Care : आपण आपल्या हृदयाची,मनाची,आहाराची आणि त्वचेची जशी काळजी घेतो त्याच पध्दतीने दातांची नियमित काळजी घेतली पाहिजे. विशेषत:उन्हाळ्यात सुट्टीचे दिवस असल्याने घरी बरेचदा गोड पदार्थ बनवले जातात. याचबरोबर उन्हाळी फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात.सुट्या असल्याने मटणावर ताव मारला जातो.अशावेळी दातांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण कधी-कधी हिरड्यात अन्नाचे कण अडकल्याने बऱ्याचदा आजारांना निमंत्रण दिले जाते. याशिवाय दातांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो.आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. कोणत्या चला जाणून घेऊया.
-दिवसातून दोनदा ब्रश करा आणि एकदा फ्लॉस करा
आपले दात निरोगी ठेवण्यासाठी आपण दिवसातून किमान दोनवेळा दात घासणे आवश्यक आहे. आणि एकदा फ्लॉस देखील करणे आवश्यक आहे. दात मजबूत आणि निरोगी ठेवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
-भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होतो. म्हणून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी थोडे-थोडे पिल्याने त्वचा तर तजेलेदार राहतेच शिवाय दात ही स्वच्छ होण्यास मदत होते.
गोड पदार्थ टाळा
जास्त साखर खाल्ल्याने शरीराला जशी हानी होते तशीच ती दातांसाठीही वाईट असते. साखरेचे सेवन केल्याने दातांवर प्लाक तयार होऊ शकतो आणि यामुळे बॅक्टेरिया जादा प्रमाणात वाढतात. यामुळे दातांचे आणखी नुकसान होऊ शकते.तसेच, कोल्ड्रिंक्ससारखे गोड पेय टाळा आणि निरोगी फळे आणि ताजे फळांचे रस निवडा.
-लिप बामचा वापर करा
ओठांना हायड्रेट ठेवण्यासाठी लिप बाम लावा आणि पुरेसे पाणी प्या.
-बर्फ खाणे टाळा
उन्हाळ्यात बर्फाचा गोळा खायचा आनंद वेगळाच असतो. याशिवाय फ्रिज मधला बर्फ देखील खाणारे शौकिन अनेकजण असतात. पण अतिप्रमाणात बर्फ खाल्याने दात खराब होतात. त्यामुळे बर्फाचे तुकडे खाणे बंद करा. थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दाताची काळजी आपण घेतोच मात्र अनेकवेळा छोट्या-छोट्या गोष्टीचे मोठ्य़ा आजारात रूपांतर होते. यासाठी दंत चिकित्सकासाचा सल्ला घ्या.
Previous Articleबिरदेववाडी येथे श्रीमंत दगडूशेठ गणेशाची प्राणप्रतिष्ठापना
Next Article रद्द झालेल्या सामन्यात बदोनीचे नाबाद अर्धशतक









