उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी विकतचे बाटलीबंद कोल्ड्रिंक घेतले जातात . यामुळे तहान तर भागते पण हे सतत पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. शिवाय लहान मुलेही ते पिण्यासाठी वारंवार हट्ट करतात. पण याला पर्याय म्हणून तुम्ही जर घरातच फळांचे ज्यूस बनवले तर ते त्यांच्यासाठी पोटभर आणि हेल्दी ठरू शकेल. आज आपण कलिंगडाचा ज्यूस कसा बनवतात ते जाणून घेऊयात.
साहित्य
२ वाट्या कलिंगड
५ ते ६ पुदिन्याची पाने
३ ते ४ बर्फाचे तुकडे
पाव चमचा काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
अर्धा लिंबू
साखर
कृती
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात कलिंगडाचे बिया काढलेले काप घ्या. यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे ,काली मिरी पावडर, मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस तसेच कलिंगडाच्या गोडीनुसार त्यात साखर घालून सर्व मिश्रण वाटून घ्या. यानंतर गाळण्याच्या साहाय्याने ज्यूस ग्लास मध्ये गाळून घ्या. यानंतर गाळून घेतलेल्या ज्यूस मध्ये कलिंगडाचे बारीक काप आणि हवे असल्यास बर्फाचे तुकडे टाकून दुपारच्या वेळेत सर्व्ह करा.
Previous Articleकार्ला देवस्थान ट्रस्ट निवडणुकीचा निकाल जाहीर
Next Article सावधान! वजनकाटे 10 मिली अचुकतेचे करा,अन्यथा…









