बऱ्याच जणांच्या घरी सकाळच्या नाश्त्याची सुरुवात पोह्यांपासून होते.पोहे हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे.कांदे पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे असे पोह्यांचे बरेच प्रकार केले जातात. पण आज आपण दही तडका पोहे कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. हे पोहे खायला चविष्ट तर पौष्टिकही आहेत.चला तर मग जाणून घेऊयात हे पोहे कसे बनवायचे.
साहित्य
१ वाटी जाड पोहे
पाऊण वाटी दही
२ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
३ चमचे शेंगदाणा
अर्धी वाटी दूध
कडीपत्ता
हिंग
जिरे मोहरी
कोथिंबीर
तेल
१ चमचा साखर
चवीपुरते मीठ
कृती
सर्वप्रथम पोहे धुवून घेऊन बाजूला झाकून ठेवावेत. जेणेकरून ते छान भिजतील. आता एका छोट्या कढईमधे ३ चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घाला. यानंतर यामध्ये शेंगदाणे घालून फ्राय करून घ्या. आता यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हिंग घाला. आणि गॅस बंद करून फोडणी थंड होऊ द्या.यानंतर भिजवलेल्या पोह्यांमधे अर्धी वाटी दूध घाला.त्याचबरोबर त्यामध्ये दही घालून सर्व मिश्रण हलवून घ्या. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घाला.आता दहीपोह्यामध्ये थंड झालेली फोडणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.उन्हाळ्याच्या दिवसात हे दही पोहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









