Mango Recipe : उन्हाळा म्हटल की आंबा, जांभुळ, करवंद, काजू, कलिंगड या फळांची लयलूटच. पोटात अन्न कमी आणि फलाहार जादा असचं समीकरण जणू सगळीकडे असतं. त्यातल्या त्यात सगळ्यांचे सगळ्यात फेवरेट म्हटल की आंबा. मग तो पिकलेला असो की कच्ची कैरी असो, नाव काढताच तोंडाला पाणी सुटु लागतं. बाजारात पिकलेले तसेच कच्चे आंबे पाहायला मिळत आहेत. पिकलेल्या आंब्याचा रस, आंबा पोळी, वडी असे अनेक प्रकार या दिवसात आपण खात असतो. एवढच नाही तर चटणी मिठ लावलेली कच्च्या आंब्याची फोटही जेवणाची लज्जत वाढवतेय. आज आपण अशीच एक झटपट होणारी अंब्याची रेसीपी पाहणार आहोत जी भाकरी, चपाती किंवा भात , सार सोबत खायला टेस्टी लागते. एवढच नाही तर तोंडाची चव ही वाढवते. तसेच तुम्ही जर उन्हाळ्यात फिरायला जाणार असाल तर सोबत हि चटणी ठेवू शकता. चला तर जाणून घेऊया ही रेसीपी कशी बनवावी.
साहित्य
कच्चे आंबे- 5 ते 6
गुळ- पाव किलो
लाल तिखट- मिरची पूड छोटी एक वाटी (तुम्हाला जादा तिखट हले तर तुम्ही वापरू शकता)
हळद- 1 चमाचा
मीठ- 2 चमचे
हिंग- 1 चमचा
मोहरी- एक चमचा
कृती
सुरवातीला आंबे स्वच्छ धुऊन घ्या. त्याची साल तशीच ठेवा. यानंतर आंबे किसून घ्या. किसलेल्या आंब्यातील पाणी पिळून काढा. यानंतर पाणी निघालेला आंबा सुट्टा करून घ्या. त्यात किसलेला गुळ, मीरचीपूड, मीठ घालून मिक्स करून घ्या. आता एका छोट्या पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात मोहरी, हिंग घाला. मोहरी तडतडली की गॅस बंद करा. यानंतर ही फोडणी गार करून ती तयार आंब्याच्या मिश्रणात घाला. आता पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्या. झाली तयार झटपट आंबा चटणी. ही चटणी एक दिवस मुरवण्यासाठी ठेवा त्यानंत सर्व्ह करा.
टीप- तुम्ही आवडीनुसार गुळ वापरू शकता.ही चटणी सात ते आठ दिवस टिकते.
रेसीपी– गायत्री देशपांडे, कागल यांची.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









