Cold Drink Recipes : उन्हाच्या झळा खूपच जाणवू लागल्या आहेत. थंड पाणी, कोल्डड्रिंक्स पिण्याचे प्रमाण जादा वाढले आहे. अशातच वातावरणातील बदलामुळे ताप, अंगावर पुरळ येणे असे आजार देखील डोके वर काढू लागले आहेत. तुम्हाला गार प्यायचं आहे शिवाय आजारांना बळी पडायची नाही अस वाटत असेल तर घरच्या घरी अगदी सोप्या पध्दतीने कोल्ड ड्रिंक बनवू शकता. यासाठी आज आम्ही काही टिप्स देणार आहोत. ज्य़ाच्या मदतीने तुम्ही प्रिमिक्सही बनवू शकता. तसेच तुमच्या आवडीचे वेगवेगळे फ्लेवरही बनवू शकता.चला तर जाणून घेऊय़ा उन्हाळ्यातील तुमच्या आवडीचे कोल्डड्रिंक्स.
साहित्य
मेजरमेंन्ट कप किंवा वाटीचा पावर करू शकता
साखर- अर्धा कप
मिल्क पावडर- अर्धा कप
कॉर्न फ्लोअर – पाऊण कप
काजू -पाव कप
मगज बी -पाव कप
दूध -1 लिटर
केशर- 4 काड्या
साखर -पाव कप
खायचा पिवळा रंग -चिमटभर
साधे दूध- पाव कप
पिस्त्याचे काप- आवडीनुसार
काजूचे तुकडे-आवडीनुसार
बदामाचे काप-आवडीनुसार
कृती-
सुरवातीला प्रिमिक्स बनवण्यासाठी साखर, मिल्क पावडर, कॉर्न फ्लोअर ,काजू, मगज बी एकत्र मिक्समधून काढून घ्या. यानंतर भांड्यात दुध गरम करायला ठेवा.यात आता साखर घाला. केशर , खायाचा रंग घालून दुधाला उकळी काढून घ्या. पाव कप दुधात 3 चमचे तयार केलेले प्रिमिक्स घाला. हे मिक्स केलेले दुध गरम दुधात मिक्स करा. आता 10 मिनिटे दुध उकळा.यानंतर दुध गार करायला ठेवा. दुध गार झाल्यानंतर त्य़ात काजुचे तुकडे, बादामाचे काप, पिस्त्याचे काप घालून फ्रिजमध्ये थोडा वेळ ठेवून द्या. अस तयार केलेले दुध तुम्ही 2 ते 3 दिवस ठेवून देखील पिऊ शकता.
टीप- तुम्ही प्रिमिक्सचा वापर करून त्यात वेगवेगळे फ्लेवर तयार करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









