वृत्तसंस्था/नवी दिल्ली
युपी योद्धाने आगामी प्रो कब•ाr लीग (पीकेएल) च्या 12 व्या हंगामासाठी स्टार डिफेंडर सुमित सांगवानला संघाचा कर्णधार म्हणून आणि आशू सिंगला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. सुमित (26) आणि आशू (27) या दोघांनीही सीझन 7 मध्ये युपी योद्धासोबत न्यू यंग प्लेयर्स (एनवायपी) म्हणून आपला प्रवास सुरू केला आणि त्यानंतर ते संघाच्याबचावात्मक सेटअपचे आधारस्तंभ बनले आहेत, असे पीकेएलच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. आश्वासक पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपासून ते नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जीएमआर स्पोर्ट्सच्या प्रणालीतील खेळाडू विकसित करण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा पुरावा आहे.
ज्यामध्ये निष्ठा, कामगिरी आणि शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. सुमित सांगवान त्याच्या चपळता, वेळेनुसार आणि रणनितीक बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो. गेल्या काही हंगामात तो सातत्याने लीगच्या टॉप डिफेंडरमध्ये स्थान मिळवत आहे. कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती केवळ त्याच्या ऑन-मॅट उत्कृष्टतेचेच नाही तर आघाडीवरुन प्रेरणा आणि नेतृत्व करण्याची क्ष्हामता देखील दर्शवते. योद्धाचा आणखी एक दिग्गज खेळाडू, आशु सिंग, प्रामुख्याने कव्हर डिफेंडर म्हणून खेळत आहे. आशुने त्याच्या अथक कामाच्या गतीने, निस्वार्थी खैळाने आणि दबावाखाली संयमाने प्रभावित केले आहे. सुमितसोबतची त्याची भागिदारी यूपी योद्धाच्या बचाव धोरणाचा पाया आहे.
मुख्य प्रशिक्षक जसवीर सिंग यांच्याकडून कौतुक
सुमित आणि आशू हे अपवादात्मक खेळाडू आणि खरे योद्धा आहेत. त्यांच्या पहिल्याच सामन्यापासून त्यांनी वचनबद्धता, शिस्त आणि संघ प्रथम मानसिकता दाखविली आहे. त्यांनी वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी आणि समर्पणाद्वारे ही जबाबदारी मिळविली आहे, असे पीकेएलच्या प्रेस रिलीजमध्ये त्यांने म्हटले आहे.. व्यावसायिक पदार्पणापासून फ्रँचायझीचा भाग असलेल्या कर्णधार आणि उपकर्णधारासह या हंगामात योद्धा अनुभवाचे आणि तरुण उर्जेचे मिश्रण करुन घरी चॅम्पियनशिपचे वैभव आणण्याचा विश्वास बाळगतात. पीकेएल 12 साठी युपी योद्धाचा संघ : रेडर्स-गुमान सिंग, डोंग गियोन ली, प्रणय राणे, भवानी राजपूत, सुरेंदर गिल, गगन गौडा, शिवम चौधरी, केशव कुमार, जतिन सिंग, डिफेंडर : मोहम्मदरेझा कबुद्रहंगी, महेंद्र सिंग, रोनक नैन, सुमित सांगवान (कर्णधार), आशू सिंग (उपकर्णधार), साहुल कुमार, हितेश काडियान, जयेश महाजन, गंगाराम, सचिन मणिपाल.









