वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलची एटीपी मानांकनात घसरण झाली असून ताज्या क्रमवारीत तो टॉप शंभरमधून बाहेर पडला आहे. 16 मानांकन गुण गमविल्याने त्याची तीन स्थानाने घसरण होत तो आता 101 व्या स्थानावर पोहोचला आहे.
गेल्या वर्षीं याच आठवड्यात सुमितने 41 मानांकन गुण मिळविले होते. चेन्नई चॅलेंजर स्पर्धेत तो पात्रता फेरीतून खेळत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याने त्या गुणांचे रक्षण केले तर गेल्या आठवड्यात बेंगळूर ओपनमध्ये त्याला केवळ 25 गुण मिळविता आले. चेन्नईमध्ये चॅलेंजर स्पर्धा जिंकून त्याने टॉप 100 मध्ये स्थान मिळविले. यापूर्वी भारताच्या काही मोजक्याच टेनिसपटूंना पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळविण्यात यश आले होते.
रामनाथन रामकुमारने 42 स्थानांची प्रगती करीत तो 420 व्या स्थानावर पोहोचला आहे. शशीकुमार मुकुंदची 20 स्थानांनी घसरण झाली तर एसडी प्रज्वल देव 595 व दिग्विजय प्रताप सिंग 623 व्या स्थानावर आहेत. सुमित नागल आता पुणे चॅलेंजर स्पर्धेत भाग घेणार आहे.









