वृत्तसंस्था / हॅगेन (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या हॅगेन एटीपी चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. दुसऱ्या फेरीतील सामन्यात बिगर मानांकीत तसेच कनिष्ठ गटातील फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम विजेता निलेश मॅकडोनाल्डने नागलला पराभूत केले.
दुसऱ्या फेरीतील सामन्यात मॅकडोनाल्डने नागलचा 6-2, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना अनेकवेळा अर्धवट स्थितीत थांबावा लागला. उभय खेळाडूंमधील ही लढत सव्वादोन तास चालली होती. अमेरिकेतील लेक्झींग्टन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या दक्षिणेश्वर सुरेशचे आव्हान जर्मनीच्या इलॉट स्पिझेरीकडून 7-6 (7-4), 6-4 असे संपुष्टात आणले. कझाकस्थानमध्ये सुरू असलेल्या प्रेसीडेन्ट चषक टेनिस स्पर्धेत भारताच्या करणसिंगचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या बिंदाकडून 4-6, 4-6 असे संपुष्टात आले.









