वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रियामध्ये सुरू असलेल्या एटीपी 250 दर्जाच्या किझबुहेल खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड टेनिसपटू सुमित नागलने एकेरीत विजयी सलामी देताना स्लोव्हाकियाच्या क्लिनचा पराभव केला.
पहिल्या फेरीतील सामन्यात नागलने क्लिनचा 6-4, 1-6, 7-6(7-3) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सुमित नागल सहभागी होत आहे. नागलचा पुढील फेरीतील सामना स्पेनच्या मार्टिनेझबरोबर होणार आहे.









