वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचे अव्वल टेनिसपटू सुमित नागलला येथे सुरू असलेल्या प्रेंच ओपन पात्रता स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने मुख्य स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले.
170 वे मानांकन असलेल्या नागलला त्याच्यापेक्षा खालचे 225 वे मानांकन असलेल्या ऑस्ट्रियाच्या जुरिज रोडिओनोव्हने 6-2, 6-4 असे दीड तासाच्या खेळात हरविले. या पात्रता स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नागलने अमेरिकेच्या मिचेल व्रुगरला हरविले होते. 2024 मध्ये चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेत नागलने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. पण येथील स्पर्धा त्याला आता हुकणार आहे.









