वृत्तसंस्था/ मियामी
भारताचा टेनिसपटू सुमित नागल मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला. पात्रता फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याला हाँगकाँगच्या कोलमन वाँगकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला होता.
नागलला वाँगने 6-3, 1-6, 5-7 अशा सेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. नागलप्रमाणे वाँगदेखील प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला आहे. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात वाँगने फ्रान्सच्या ह्युगो गॅस्टनचा 6-2, 3-6, 6-2 असा पराभव केला. नागलनेही पहिल्या सामन्यात कॅनडाच्या गॅब्रियल डायलोला हरविताना उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते. पण हा जोम तो अखेरच्या सामन्यात टिकवू शकला नाही.









