वृत्तसंस्था / टॅम्पेरे
फिनलँडमध्ये सुरू असलेल्या टॅम्पेरे एटीपी चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना अर्जेंटिनाच्या निकोलास किकेरचा पराभव केला.
एटीपीच्या मानांकनात 306 व्या स्थानावरील सुमित नागलने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत किकेरचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. नागलने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 10 चॅलेजर्स स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली असून त्यापैकी त्याने 6 स्पर्धां जिंकल्या आहेत.दरम्यान अमेरिकेतील क्रेनब्रुक क्लासीक टेनिस स्पर्धेत भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रामकुमार रामनाथन यांना दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या डोस्टेनिक आणि किटे यांच्याकडून 6-4, 4-6, 7-10 असा पराभव पत्करावा लागला.









