वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय टेनिसपटू सुमित नागलने जर्मनीतील हेगन येथे स्पेनच्या कार्लोस सांचेझ जोव्हरवर सरळ सेटमध्ये विजय मिळवत प्लॅट्झमन ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
307 व्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय खेळाडूने मातीच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पहिल्या फेरीत उच्च क्रमांकावर असलेल्या जोव्हरचा 6-2, 6-2 असा पराभव केला.बुधवारी 16 व्या फेरीत तो 17 वर्षीय जर्मन टेनिसपटू निल्स मॅकडोनाल्डशी लढेल.या महिन्याच्या सुरुवातीला ट्रिस्टे चॅलेंजर आणि टॅम्पेरे ओपनमध्ये दोन उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर नागलने स्पर्धेत प्रवेश केला.









