वृत्तसंस्था/ बेंगळूर
20 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या पाचव्या बेंगळूर खुल्या एटीपी चॅलेंज टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागलला मंगळवारी पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धा आयोजकांनी प्रवेश दिला आहे. सदर स्पर्धा कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित केली असून या स्पर्धेतील सामने टेनिस संघटनेच्या स्टेडियमवर खेळवले जातील. 25 वर्षीय सुमित नागल हा भारताचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू असून त्याला यावेळी पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. 2017 साली सुमित नागलने ही स्पर्धा जिंकली होती. 2018 आणि 2020 झालेल्या या स्पर्धेमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 20 फेब्रुवारीपासून खेळविल्या जाणाऱ्या सुमित नागल, लुकास पौली, गेल्या वर्षींचा या स्पर्धेतील विजेता चून सेंग यांचा समावेश आहे.









