वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीपी टूरवरील सुरू असलेल्या बेंगळूर खुल्या चॅलेंजर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर आणि एन. प्रशांत यांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. मात्र, भारताच्या सुमित नागलचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स प्युरसेलने सुमित नागलचा 4-6, 6-3, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर आणि एन. प्रशांत यांनी झिम्बाब्वेचा बेंजामिन लॉक आणि ऑस्ट्रेलियाचा सँटीलेन यांचा 3-6, 6-4, 12-10 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. सदर स्पर्धा बेंगळूरमधील कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर खेळविली जात आहे. एकेरीत पाचव्या मानांकित लुका नरदीने जंगचा 7-5, 5-7, 6-2 तर कुझमेनोव्हने कॅचमेझोव्हचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









