वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीपी टूरवरील सुरु असलेल्या टॅम्पीअर खुल्या पुरुषांच्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमीत नागलचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या वेनबर्गने पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या शेषा वेनबर्गने भारताच्या सुमीत नागलचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. 2025 च्या टेनिस हंगामात सुमीत नागलच्या कामगिरी चांगले सातत्य असल्याचे दिसून आले. इटलीमध्ये झालेल्या स्पर्धेत नागलने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.









