वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा बॅडमिंटनपटू बी. सुमित रेड्डीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली असून भविष्य काळात तो प्रशिक्षण क्षेत्रावर अधिक भर देणार आहे.
हैद्राबादचा 33 वर्षीय बी. सुमित रेड्डी हा भारतीय संघातील दुहेरीचा हुकमी बॅडमिंटनपटू म्हणून ओळखला जात असे. मिश्र दुहेरीत सुमित रे•ाr आणि मनु अत्री या जोडीने विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सुमित रेड्डीची पत्नी एन. सिक्की रे•ाr ही बॅडमिंटनपटू आहे.तिने अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2022 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र सांघिक विभागात रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये सुमित रेड्डीचा समावेश होता. 2014, 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. बॅडमिंटन क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षण क्षेत्रावर अधिक भर देणार असल्याचे सुमितने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









