वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीपी टूरवरील येथे झालेल्या इंडियन्स वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड टेनिसपटू सुमित नागलने पदार्पणातच पात्रता टप्प्यातील अंतिम फेरी गाठली आहे.
एटीपी टूरवरील ही स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याकरीता पात्र फेरीचे सामने खेळविले जातात. या टप्प्यातील पहिल्या सामन्यात नागलने अमेरिकेच्या वाईल्डकार्ड धारक स्टिफेन डोस्टेनिकचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. सुमीतकडून या सामन्यात दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडले. आता सुमीत या टप्प्यातील अंतिम फेरीत पोहोचला आहे. तत्पूर्वी त्याने या स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविताना 10 मानांकन गुण आणि 14,400 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. आता पुढील फेरीत नागलची लढत कोरियाच्या हाँगशी होणार आहे.









