वृत्तसंस्था /चेन्नई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या चेन्नई खुल्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना इटलीच्या फोनिओचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात सुमीत नागलने फोनिओचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात इटलीच्या टॉप सिडेड लुका नेर्डीने ऑस्ट्रेलियाच्या टॉमिकचे आव्हान 7-5, 6-3 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.









