वृत्तसंस्था/ पंचकुला (हरियाणा)
आयजीयु हरियाणाच्या येथे आयोजिलेल्या इंडिया कनिष्ठ मुलांच्या गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेत कॅटेगिरी अ मध्ये दर्जेदार कामगिरी करत सुखमन सिंगने विजेतेपद पटकावले. सुखमन सिंगने शेवटच्या फेरीअखेर सरासरी 288 गुण नोंदवले.
या स्पर्धेत जुहर सिंगने 291 सरासरी गुण नेंदवत दुसरे स्थान तर अंगड सिंगने 292 गुणासह तिसरे स्थान मिळवले. ब गटात अनशुल मिश्राने 7-ओव्हर 295 गुणासह विजेतेपद मिळवले. पश्चिम बंगालच्या मिश्राने गेल्या आठवड्यात नॉर्दन इंडियन गोल्फ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावले होते. मुलांच्या क गटात चैतन्य पांडेने 217 गुणासह विजेतेपद पटकावले.