गळ्यात अडकवला फलक अन् भांडी केली साफ
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी मंगळवारी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर गुरुद्वाराच्या बाहेर शिक्षा भोगली आहे. मंगळवारी दुपारी सुखबीर हे व्हिलचेअरवरून गुरुद्वारामध्ये पोहोचले. त्यांच्या गळ्यात दोषी असल्याचा फलक होता, बादल यांनी सेवादारांचा पेहराव परिधा केला होता, हातात पहारेदारांसाठीचा भाला होता, सुखबीर यांनी सुवर्णमंदिरात सामूहिक स्वयंपाकघरात भांडीची साफ केली आहेत.
सुखबीर यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने त्यांनी व्हिलचेअरवरूनच पहारेदारी केली आहे. गुरुद्वाराच्या मुख्य द्वाराच्या दुसऱ्या बाजूला व्हिलचेअरवरच अकाली नेते सुखदेव सिंह ढींढगास देखील गळ्यात फलक अडकवून पहारेदाराच्या वेषात दिसून आले. गुरुद्वाराच्या लंगमध्ये अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मजीठिया दिसून आले आहेत. मजीठिया यांनी भांडी स्वच्छ करत सेवा केली आहे.
सुखबीर सिंह यांना शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायालय म्हणजेच श्री अकाल तख्त साहिबने धार्मिक शिक्षा सुनावली आहे. गुरुद्वारामध्ये सेवा करत भांडी स्वच्छ करण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती. श्री दरबार साहिबमध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांची साफसफाई देखील त्यांना करावी लागणार आहे. जत्थेदार श्री अकाल तख्तने बादल आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना 2007-17 पर्यंत राहिलेल्या अकाली सरकारच्या कार्यकाळातील धार्मिक चुकांबद्दल शिक्षा सुनावली आहे. त्या शिक्षेची भरपाई अकाली नेत्यांनी सेवा करून केली आहे.
श्री अकाल तख्ने अकाली दल सरकारच्या कार्यकाळात धर्मविरोधी वर्तनाप्रकरणी दोषी ठरत सुखबीर सिंह बादल यांचे दिवंगत पिता प्रकाश सिंह बादल यांना मिळालेला फख्र-ए-कौम मानही मागे घेतला आहे. अकाली दलाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यांना शिक्षा सुनावली आहे.
अकाली दलाचे नेते दलजीत सिंह चीमा, विक्रम सिंह मजीठिया आणि महेशिंदर सिंह ग्रेवाल यांनीही धार्मिक दंडाच्या अंतर्गत सुवर्ण मंदिरातील शौचालये साफ केली आहेत. बलविंदर, सुच्चा सिशंह लंगाह, बीबी जागीर कौर आणि प्रेम सिंह चंदूमाजरा समवेत अन्य नेतेही सेवा करताना दिसूनन आले आहेत. अकाल तख्तकडून अकाली दलाच्या नेत्यानी राजकीय पक्षांच्या दृष्टीकोनातून ही सर्वात मोठी शिक्षा मिळाली असल्याचे मानले जात आहे.
आरोप काय?
सुखबीर बादल आणि त्यांच्या मागील मंत्रिमंडळाच्या विरोधात अकाल तख्तने दोष सिद्ध केले आहेत. बादल यांनी ईशनिंदाप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला माफी मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे. बादल यांनी राम रहिम विरोधातील तक्रार मागे घेण्यास स्वत:च्या प्रभावाचा वापर केल्याचा आरोप आहे. श्री गुरुग्रंथ साहिबच्या अवमानाप्रकरणी कारवाई केली नाही आणि पोलीस महासंचालक म्हणून सुमेध सैनी यांच्या नियुक्तीला धार्मिक स्वरुपात गुन्हा ठरविण्यात आले आहे.









