एकच अर्ज आल्याने निवड जाहीर : विरोधकांची अनुपस्थिती
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुखदा कमलाकर तेली यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अपेक्षेप्रमाणे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी निवडणूक अधिकारी या नात्याने हि निवड जाहीर केली. या विशेष बैठकीस विरोधी गटातील सर्व सहाही नगरसेवक अनुपस्थित राहिले.
गेल्या अनेक दिवसांपासून डिचोली नगरपालिकेत सुरू असलेल्या राजकीय नाटय़ावर अखेर पडदा पडला. नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आठ जणांच्या गटातर्फे उपनगराध्यक्ष म्हणून अखेर सुखदा तेली यांची वर्णी लागली.
डिचोली नगरपालिकेत झालेल्या या विशेष बैठकीस नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह नगरसेविका सुखदा तेली, अँड. रंजना वायंगणकर, दिपा पळ, विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर व निलेश टोपले यांची, तर निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, पालिका मुख्याधिकारी ग्ल?न मदेरा यांची उपस्थिती होती.
उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी या बैठकीचा अहवाल वाचून दाखविला. एकच अर्ज असल्याने सुखदा तेली यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सुखदा तेली यांचे डिचोलीतील भाजपचे जे÷ नेते वल्लभ साळकर यांच्यासह इतर भाजपच्या मंडळातील पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले.
पालिका मंडळात आमचा आठ जणांचा गट जरी एकत्रित आला असला तरी विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जणार नाही. सर्व प्रभागांमध्ये समान विकासाला न्याय दिला जणार आहे. डिचोली नगरपालिका क्षेत्रातील एकही भाग विकासापासून वंचित राहू नये यासाठी आपण कार्य कराणार. या कामी सर्व नगरसेवकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सुखदा तेली यां?नी केले.
डिचोली नगरपालिकेतर्फे आजपर्यंत कधीही विकासाचे राजकारण झालेले नाही. गेले एक वर्ष आपण या पालिकेत नगराध्यक्ष म्हणून ताबा घेतल्यानंतर सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांमधील विकासाला योग्य न्याय व निधी दिला आहे. त्याचप्रमाणे यापुढेही सर्व प्रभागांना योग्य न्याय विकासाच्या बाबतीत दिला जाईल. असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यां?नी सांगितले.









