वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदमने विश्व पॅरा बॅडमिंटनपटूंच्या जागतिक मानांकनात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पॅरा बॅडमिंटन ताजी विश्व मानांकन एसएल-4 यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सुकांत कदम दुसऱ्या स्थानावर आहे.
अलिकडेच झालेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदमची कामगिरी दर्जेदार झाली आहे. पॅरा बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत इंडोनेशियाचा फ्रेडी सेटीवान 56680 गुणांसह पहिल्या स्थानावर असून सुकांत कदम 53650 गुणांसह दुसऱ्या तर फ्रान्सच्या लुकास मेझुर 48400 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्पेनमधील झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांतने एसएल-4 विभागात सुवर्णपदक पटकाविले होते.









