वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटनपटू सुकांत कदमने आपली पात्रता सिद्ध करुन या स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू सुकांत कदम पुरूषांच्या एस. एल. 4 कॅटेगेरीमध्ये सहभागी होणार आहे.
पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याचे माझे स्वप्न असून त्यासाठी मी जोरदार सराव करीत असल्याचे सुकांतने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून पॅरा स्पर्धांमध्ये सुकांत कदमच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुकांत कदमने कांस्यपदक मिळविले होते.









