वृत्तसंस्था / झाग्रेब (क्रोएशिया)
येथे सुरू असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारतीय मल्लांची कामगिरी असमाधानकारक झाली. भारताचा मल्ल सुजीत कालकलचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. मात्र सुजीतने इराणचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल रेहमान मुसा खलीलीने चुरशीच्या लढतीत सुजीतचा 6-5 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या इतर मल्लांचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. पुरूषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल वजन गटात सुजीतला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इराणच्या खलीलीने पराभव केले. सुजीतने यास्पर्धेतील पहिल्या लढतीत तुर्कीच्या केव्हिट अॅकेरचा 15-5 तर त्यानंतर दुसऱ्या लढतीत कोरियाच्या किमचा 9-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. महिलांच्या विभागात भारताच्या निशुला 55 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या युचीदाने पराभूत केले तर 59 किलो गटात भारताच्या सारिकाला अॅनेस्टेसिया सिडलेनीकोव्हाने पराभूत केले.









