क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट वरिष्ठ संघाची संभाव्य यादीची घोषणा करण्यात आली असून या संघात बेळगावच्या सुजय सातेरीची निवड झाली आहे.
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ निवड समितीने संभाव्य 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये केएल. राहुल, मयांक अगरवाल, प्रसिद्धकृष्णा, मनिष पांडे, देवदत्त पडीकल, गौतम के., समर्थ आर., विद्यावत, कावीरप्पा, निखिल जोस, कौशिक व्ही., व्यशक व्ही., समर्थ श्रीनिवास, सुचित जे., शुभांग हेगडे, वेंकटेश एम., मनोज बांडगी, शरद बी. आर., हार्दिक राज, निश्चित जी., किशन बेड्रे, विशाल उनित, रोहितकुमार ए. सी., यशवर्धन पी., कार्तिक कृष्णा, शरण आर., अभिला शेट्टी, शशांककुमार के., मौसिन खान, अवनिश के. व्ही., अनिश्वर गौतम, अभिनव मनोहर व सुजय सातेरी (बेळगाव) यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी पी. व्ही. शशिकांत, गोलंदाज प्रशिक्षक मन्सूर अली खान यांचा समावेश आहे.
रोनित मोरे, दीपक चौगुले, रोहण कदम यानंतर बेळगावच्या सुजय सातेरीची कर्नाटक रणजी संघात वर्णी लागली आहे.









