Sujat Ambedkar : भाजपच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेला आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत. संविधान आणि लोकशाहीवर हल्ला होणार अशी भिती होतीच अस बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकरांनी आज खासगी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, भाजपच्या हाती सर्वांनी सत्ता दिली. मात्र संविधान आणि लोकशाहीवर हल्ला होणार ही भीती सर्वांनाच होती. भाजप हिंदूराष्ट्र स्थापन करणार पण यामध्ये देखील वेगवेगळे पैलू येणार आहेत. दलितांवरती, हिंदुच्यामध्ये बहुजणांवरती,आदिवासी लोकांवरती आणि हिंदु महिलांचे अधिकार हिरावून घेतले जाणार आहेत. पण आम्ही याला विरोध करणाचं. भाजपच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेला आम्ही ठामपणे विरोध करणार असल्याचेही सुजात आंबेडकर म्हणाले.
Previous Article‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ मधून 100 वर्षापूर्वी काळ्या पैशाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले…; देवेंद्र फडणवीस
Next Article कडक उन्हाळ्यात स्वतःची अशी घ्या काळजी








