Sunil Patil News : रायगडावर आज 350 वा राज्य़ाभिषेक दिन साजरा झाला. यावेळी आयोजनातील त्रुटी आणि कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली नाही म्हणून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे हे किल्ले रायगडावरील कार्यक्रमातून तडक निघून गेले. यावरून आता राजकीय वर्तुलात चांगलीच चर्चा रंगलीय. तर यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतीक्रिया दिली आहे. तर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
का नाराज आहेत सुनील तटकरे
काही जणांकडून कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय.कार्यक्रम सरकारी होता, खासगी नव्हे. गोगावलेंवर नाराजी नाही, सरकारवर नाराज आहे. राजशिष्टाचाराते नियम पाळले नाहीत.आयोजनात त्रुटी आहेत मला बोलू दिलं नाही.शिवप्रेमी नागरीक म्हणून मी या कार्यक्रमात सहभागी होतो. सुरवातीपासून कार्यक्रम होतच आला. झाला. पण राज्यशासनाकडून कार्यक्रम जेव्हा घेतले जाता तेव्हा राज्य शिष्टासारखे काही नियम आहेत.पण हे नियम पायदळी तुडवत राजकीय अभिवेषाणे कार्यक्रमाची झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे तडकाफडकी मी निघून आल्याचे सुनील तटकरे यांनी एका खासगी वाहिनीला सांगितले.
शिंदे, फडणवीस यांची प्रतिक्रिया
आजचा दिवस चांगला आहे. या सोहळ्याचे साक्षीदार व्हायला पाहिजे.आनंद घ्यायला पाहिजे.सगळ्यांच्याच नशीबात अस क्षण येत नाहीत. आणि सुरुवातीपासून तटकरे सोबत होतेच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर हे राजकारण नाही तर काय आहे. तुम्ही जर पूर्णवेळ सोहळ्यात होता तर नाराजी कशाबद्दल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. काही लोकांना केवळ राजकारणचं करायचं असतं.आजचा दिवस संकल्पाचा आहे, नाराजीचा नव्हे.काही जणांना केवल राजकारण करण्यात रस आहे. त्यांना फक्त सत्ता हवीय.रयतेचं राज्य या कल्पना त्यांना मान्यच नाहीत.त्यांना परीवाराचं राज्य हवयं. छत्रपती शिवरायांनी रयतंच राज्य निर्माण केलयं. अस त्यांनी म्हटलयं.