प्रतिनिधी, रत्नागिरी
Suicide Video Viral In Ratnagiri : आत्महत्येची माहिती देणारा आणखी एक व्हिडिओ शहरात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. माझ्या आत्महत्येला रत्नागिरीतील तलाठी जबाबदार आहे, असे स्पष्ट करत विषारी द्रवप्राशन करून आत्महत्येपूर्वीचा हा व्हिडिओ तरुणाने व्हायरल केला. कौटुंबिक विषयातून त्याने हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. पोलिस यंत्रणेकडेही हा व्हिडिओ पोचल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून,त्याने विषारी द्रवप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
व्हायरल व्हिडिओत या तरुणाने म्हटले आहे, ‘माझ्या आत्महत्येला रत्नागिरीतील तलाठी जबाबदार आहे.’शहराजवळील एका सोसायटीत हा तरुण पत्नी आणि मुलीबरोबर राहतो.याच सोसायटीत तलाठी राहतो, असे त्याने व्हिडिओत सांगितले आहे.तलाठ्यामुळे कुटुंबात ताणतणाव आहे. म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे व्हिडिओत म्हटले.
या तरुणाने आपण आत्महत्या करते असल्याचे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत शिवाजीनगर येथील एका उद्यानात जाऊन विष प्राशन केले.याबाबतची माहिती पोलिसांना कळताच तातडीने त्याचे मोबाईल लोकेशन शोधत त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हिडिओची आणि प्रकरणाची शहर पोलीस चौकशी करीत आहेत.









