प्रतिनिधी,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागातील सहायक प्राध्यापकाचा मृतदेह मंगळवारी रात्री राजाराम तलावात आढळून आला. शैलेश रमाकांत वाघमारे (वय 38 रा. मोरेवाडी. केदारनगर मूळ गाव आटपाडी, सांगली) असे त्यांचे नाव आहे. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.आर्थिक विवंचनेतून प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबतची माहिती अशी, शैलेश वाघमारे हे मोरेवाडी येथील केदारनगरमध्ये राहत होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांनी काम केले. पण त्यानंतर ते घरी गेले नाहीत. दरम्यान, राजाराम तलावामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती येथील नागरिकांनी फोनवरुन राजारामपुरी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला कळवले. मंगळवारी रात्री 11 वाजता अग्निशमन दलाचे जवान चंद्रकांत पाटील, योगेश कदम, महेश पाटील आणि राजारामपुरी पोलीसांनी वाघमारे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सीपीआरमध्ये त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









