Suicide of an adult in Devgad!
देवगड पवनचक्की – साटमवाडी येथील प्रकाश आत्माराम साटम (५५) यांनी तेथील परिसरातील आंब्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास उघडकीस आली.
प्रकाश साटम यांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेतच त्यांनी आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज देवगड पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची फिर्याद त्यांचा भाऊ आनंद आत्माराम साटम यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.









