संख / वार्ताहर
जत तालुक्यातील अंकलगी येथील प्रशांत यमनापा अजमाने (वय २८) या ऊसतोड मूकादामाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद उमदी पोलीसात झाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. परिसरात मात्र उलट सुलट चर्चा सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील अंकलगी येथील प्रशांत अजमाने हा ऊसतोड मुकादाम म्हणून गेली दोन वर्षे कर्नाटक कारखान्याला मजूर पुरविण्याचे व्यवसाय करीत होता. तो पत्नी, दोन मुली, एक मुलगा व समवेत येथे राहत होता.
आज दिनांक 30/8/2022 मंगळवार रोजी अंकलगी गावापासून दोन किलोमीटरवर उटगी रोड लगतच्या सरकारी वनविभागाच्या हद्दीत लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत पत्नी राजश्री प्रशांत अजमाने यांनी उमदी पोलीसात फिर्यद दिली आहे. उमदी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन साठी जत ग्रामीण रुग्णालयात येथे करून नातेवाईकांना देण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक आप्पासाहेब हाक्के करीत आहेत.