रत्नागिरी प्रतिनिधी
रिक्षातील प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अविनाश म्हात्रे हा रिक्षा चालक राहत असलेल्या साईदीप ग्रह संकुल, शांतीनगर, नाचणे या इमारतीच्या टेरेसवर रिक्षा चालकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढल्यावर पोलिसाना कळवण्यात आले.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी गैरवर्तन केल्या प्रकरणी अविनाश म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. यानंतर शनिवारी रिक्षाचालकाने आत्महत्या केली. याआधी सोशल मीडियावर आपल्या सोबत घडल्या प्रकाराची पोस्ट संबंधित युवतीने पोस्ट टाकल्यावर सामाजमाध्यमावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.









