स्वत:वर झाडून घेतली गोळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलीस विभागातील सहाय्यक उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्वरद्वारे गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या क्वार्टरमध्ये आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत घेत तपास हाती घेतला आहे.
मृत पोलीस अधिकारी हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता आणि तो 1994 मध्ये दिल्ली पोलीस दलात भरती झाला होता. त्याच्या आत्महत्येसंबंधी कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. तर गुन्हे अन्वेषण विभाग आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जात पाहणी केली. घटनास्थळी मृत अधिकाऱ्याने लिहिलेली सुसाइट नोट मिळालेली नाही.
संबंधित पोलीस अधिकारी कौटुंबिय समस्येने त्रस्त होता, यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रारंभिक तपासात आढळून आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 194 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.









