सांगली/प्रतिनिधी
सांगली येथील लक्ष्मी कॉलनीतील जुबेर सलीम चौगुले ( वय ३० ) या जावयाच्या आत्महत्येप्रकरणी सासऱ्यासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
पत्नीला नांदवायला पाठविण्यास सासरच्यांनी नकार दिल्याने जुबेरने गेल्या आठवड्यात राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होते. जुबेरचे वडील सलीम महम्मद चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत जुबेरचा सासरा रमजान सय्यद, त्याची बहीण, मोहसीम सय्यद तिघे रा. उदगाव, ता. शिरोळ) व मोहसीन शेख (रा. शंभरफुटी रस्ता, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षापूर्वी जुबरेचे उदगाव येथील सुमय्या हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर जुबेरला मुलगा झाला. सुमय्या घरातील कोणचेही काम ऐकत नव्हती. तसेच घरातील काहीच काम करीत नव्हती. त्यामुळे जुबेरने तिच्या घरच्यांना बोलावून घेतले. पण तिच्या घरच्यांनी सुमय्याला काहीच समजावून सांगितले नाही. उलट त्यांनी जुबरेला तुम्ही आमच्या मुलीला खूप काम लावता. तिचा व्यवस्थित सांभाळ करीत नाही. आम्ही सुमय्याला नांदविण्यास पाठविणार नाही, असे सांगून ते सुमय्याला घेऊन गेले.
जुबेरने अनेकदा सासरे रमजान सय्यद याच्याशी संपर्क साधून सुमय्याला पाठविण्याची विनंती केली. पण सासऱ्याने नकार दिला. त्यामुळे जुबेर नाराज होता. पत्नी व आणि मुलगा जवळ नसल्याने त्याला नैराश्य आले. यातून त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे जुबरेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासयासह चौघांवर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.