जत, प्रतिनिधी
Sangli News : जत तालुक्यातील रामपूर येथील कोळेकर वस्ती येथे दोन प्रेमी युगलांची आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसापासून जत तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच आहे, त्यात ही घटना घडल्याने हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात याबाबत आता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
उमेश उर्फ पिंटू अशोक कोळेकर वय 23 व तर प्रियंका बाळासाहेब कोळेकर वय 25 अशी या दोघांची नावे आहेत. यातील उमेश याने रामपूर गावा जवळील ओढ्या नजीक विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर प्रियंकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या दोन्ही आत्महत्याची कारणे देखील तपासण्यात येत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









