प्रतिनिधी,रायगड
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव महावितरण विभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर काम करत असलेल्या २८ वर्षीय तरुणीने महावितरणच्या निवासी वसाहतीमध्ये आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.अभिलाषा अभिमन्यू शेळके मूळ राहणार छत्रपती संभाजी नगर असे आत्महत्या केलेल्या तरुणीची नाव आहे.
गोरेगाव (जि.रायगड) पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, संभाजीनगर येथे राहणारी अभिलाषा इंजिनीयर असून मागील तीन वर्षापासून गोरेगाव येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होती.वितरण कंपनीच्या निवासी संकुलामध्ये ती एकटीच राहत होती. याच घरात अभिलाषाने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.
अभिलाषा शेळके ही शुक्रवारी कामावर आली नाही म्हणून महावितरणचे कर्मचारी तिच्या घरी गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. अभिलाषाने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिले असून, यामध्ये तिने आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले आहे. परंतु तिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार उभारे तपास करत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








