वारणानगर/प्रतिनिधी
जाखले (ता. पन्हाळा) येथील शरद शहाजी धोंगडे (वय ३२)या या शेतकरी युवकाने रहात्या घरी रविवार दुपारी ३. ३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. तो विवाहीत असून त्याला एक मुलगी आहे.
दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. शरद हा शेतकरी असून शेतीच्या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाची उपजीवीका चालवित होता. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हाळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, वडील असा परीवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करणेत आले.









