आंध्र प्रदेशातल्या महाविद्यालयातील प्रकरण
वृत्तसंस्था/विजयवाडा
आंध्र प्रदेशातील नारायणा महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने भर वर्गातून बाहेर पडून तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या फिरत आहे. त्यातून ही घटना समजली. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या महाविद्यालयातील वर्गांमध्ये शिक्षण देण्याचे काम होत होते. साधारण सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी प्रथम वर्षाच्या एका वर्गातून एक विद्यार्थी अचानक वर्गाबाहेर पडला. त्याने त्वरित तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. जोरदार मार बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला रुग्णालयात पोहचविण्यात आले. तथापि तेथे जाण्याआधीच त्याने आपला अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याने खाली अकस्मात उडी घेतल्याने आश्चर्यचकित झालेले शिक्षक आणि इतर विद्यार्थी काहीही करु शकले नाहीत. तिसऱ्या मजल्यावरील सर्व शिक्षक आणि विद्याथै हे दृष्य पाहून वर्गाबाहेर पडले. पण ते खाली जाण्याच्या आतच विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता. आंध्र प्रदेश सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित चौकशीचा आदेश दिला.
कारण अद्याप अज्ञात
या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला असून चौकशीअंती या प्रश्नाचे उत्तर हाती येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. हा सर्व प्रसंग सीसीटीव्हीवर नोंद झालेला असून हा व्हिडीओ झपाट्याने पसरत आहे. अनेकांनी त्यांची मते व्यक्त केली असून या विद्यार्थ्यावर कोणता तरी दबाव असण्याची शक्यता माध्यमांवर व्यक्त होत आहे.
ओळख गुप्त
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचा परिचय अद्याप उघडकीस आणण्यात आलेला नाही. तथापि, चौकशीनंतर नाव उघड केले जाऊ शकते. असा प्रसंग या राज्याच्या इतिहासात पाहिलाच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयाच्या प्रशासनानेही या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्याच्या मातापित्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. मात्र, तेही या आत्महत्येच्या कारणांवर प्रकाश टाकू शकले नाहीत. fिंवद्यार्थ्याच्या साधनसामग्रीची तपासणी केल्यानंतरही आत्महत्येसंबंधी कोणतीही चिठ्ठी आढळली नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. मात्र, हा हत्येचा प्रकार नाही, हे स्पष्ट झाले आहे.









