शाहरुख खानसोबत झळकणार
शाहरुख खानची कन्या सुहाना लवकरच स्वत:च्या पित्याप्रमाणे अभिनयाच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. जोया अख्तरच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट ‘द आर्चीज’मधून ती पदार्पण करणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट स्ट्रीम होण्यापूर्वी सुहानाला आणखी एक चित्रपट मिळाला आहे.

सुहानासाठी शाहरुखकडूनच या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. शाहरुख खान हा सुहानाच्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा सिद्धार्थ आनंदसोबत काम करणार आहे. शाहरुख अन् सिद्धार्थ आनंद यांनी यापूर्वी ’पठान’मध्ये अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून एकत्र काम केले आहे. ही जोडी आता नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेन्मेंट आण मार्फ्लिक्स पिक्चर्सकडून केली जाणार आहे.
सध्यातरी या चित्रपटाशी निगडित सर्व तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत. या चित्रपटासाठी शाहरुख अन् सुहाना दोघेही अत्यंत उत्सुक असल्याचे सांगण्यात आले. शाहरुख यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचे समजते. शाहरुख लवकरच ‘जवान’ चित्रपटात दिसून येणार आहे. यात त्याच्यासोबत नयनतारा अन् विजय सेतुपति देखील आहे.









