कोल्हापूर, प्रतिनिधी
Kolhapur Sugarcane Season : गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने साखर कारखान्यांची लगबग सुरु झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू होत असला तरी पावसाने साथ दिल्यास ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कारखान्यांची धुरांडी सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस तोडणी टोळ्या ठरवण्यासह तांत्रिक साफसफाईचे काम जोरात सुरू आहे.
जिह्यात साधारण एक लाख 63 हजार 368 हेक्टरवर उसाचे पिक आहे. यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाला आहे. तसेच मागील दोन वर्षातील महापुराने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तुलनेत यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने जिह्यात सरासरी दहा टक्के उसाचे क्षेत्र वाढले आहे. हंगाम सुरु करण्यापूर्वी मेन्टनन्स खर्च, तोडणी टोळ्यांना ऍडव्हान्स, शासकीय कर व इतर देणी अशी हंगामपूर्व कामे उरकण्याची घाई कारखाना व्यवस्थापनाकडून सुरू आहे.
जिह्यात सर्वच साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्न पार पडण्याची आशा आहे. दिवाळी झाल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात उसतोडणी मजूर मोठय़ा संख्येने जिह्यात येण्यास सुरूवात होईल. विदर्भ मराठवाडय़ात यावर्षीसह मागील दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने कारखान्यांना उसतोडणी मजूरांचा तुटवडा जाणवणार आहे. दरम्यान, जिह्यातील 22 कारखान्यांना हंगामपूर्व खर्चासाठी किमान दीड हजार कोटींची गरज आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यातील अनेक कारखान्यांना मिळून 150 कोटींची मदत करेल अशी अपेक्षा आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम व काटेकोर व्यवस्थापन असलेले कारखानेच चाल्tढ हंगामात तग धरतील, असे तज्ञांचे मत आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









