नांद्रे प्रतिनिधी
Miraj Sugarcane Burned : नांद्रे येथील विद्युत वाहक तारांमुळे स्पार्क होऊन पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.गावातील तरूणांच्या सतर्कतेमुळे अनेक एकर ऊस वाचवण्यात यश आले. गावात मुख्य पीक ऊस असल्याने हाजारो हेक्टर ऊस शेती आहे. शेतातून जाणाऱ्या विद्युततारांच्या मुळे शाँर्टसकिट होऊन पत्रकार महेबूब मुल्ला यांच्या शेतात स्पार्क होऊन मुल्ला व भिलवडे यांचे मिळून पाच एकर ऊस जळून खाक झाला. मुल्ला यांच्या शेतातील शेड जवळ ऊस पेटल्याचे वृत्त गावात कळताच शेकडो तरुणांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. यामुळे इतर पिकांचे नुकसान टळले.
या घटनेची माहिती मिळताच तलाठी स्वप्निल शिंदे, कर्मचारी भरत पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. नांद्रेत पाच एकर ऊस जळल्याची घटना श्री.दत्त इंडियाचे कार्यकारी संचालक मुत्यूजंय शिंदे यांना संपर्क करून मुल्ला यांनी दिली असता त्यांनी तात्काळ दखल घेतली. मुख्य शेती अधिकारी मोहन पवार,सांगली सेंन्टर प्रमुख गणेश तावदर,फिल्डमन अभिजीत भोसले,शेती मदतनिस पटेल, विकी पाटील यांनी पाहणी करून तात्काळ जळीत ऊस तोडून गाळपास कारखान्याकडे पाठिवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








