कोल्हापूर / संतोष पाटील :
देशात मागील वर्षीच्या तुलनेत 535 पैकी 533 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम घेतला. मागील वर्षी 302.50 लाख टन साखर उत्पादित झाली होती. मात्र यंदाच्या वर्षी देशभरात सुमारे 54 लाख टन साखर कमी उत्पादित झाल्याचा अहवाल राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या 31 मार्च 2025 रोजी प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्रात 207 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला सुरू असून मागील वर्षी 110.20 लाख टन साखर उत्पादित केली होती. यंदाच्या वर्षी 200 कारखान्यातून 80.10 लाख टन साखर उत्पादीत झाली. देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रातून सुमारे 75 टक्के साखर उत्पादनात घट होणार आहे.
महाराष्ट्रातील 122 पैकी 74 कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून 48 कारखाने सुरू आहेत. तर देशातील 534 पैकी 439 कारखान्यांचा गळीत हंगाम 31 मार्चपर्यंत संपला आहे. मागील वर्षी राज्यात 1046.83 लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर देशात 2981.04 मे लाख टनाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 2653.26 लाख टन गाळप झाले. तुलनेत 327 लाख टन कमी म्हणजेच 11 टक्के उसाचे कमी गाळप यंदाच्या वर्षी झाले आहे. राज्यात मागील वर्षी 110.20 लाख टन साखर उत्पादीत झाली होती. यंदाच्या वर्षी 80.20 लाख टन झाली आहे. मागील वर्षी 10.25 टक्के रिकव्हरी होती तर यावेळी त्यामध्ये घट होऊन 9.50 टक्के झाली. देशपातळीवरील रिकव्हरी सरासरी 10.26 टक्क्यावरुन 9.30 टक्के इतकी आहे.
उत्तरप्रदेशमध्ये 122 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. यातील 65 कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे.904.12 लाख टन उसाचे गाळप करुन 87.70 लाख टन साखरेची उत्पन्न घेतले आहे. मागील वर्षी 921 लाख टन उसाच्या गाळपातून 97.20 लाख टन साखर उत्पादीत केली होती. साखर उत्रायात घट झाली असून मागील वर्षी सरासरी साखर उतार 1055 वरुन 9.70 टक्क्यावर आला आहे. कर्नाटक राज्यात मागील वर्षी पेक्षा तीन जादा कारखान्यासह 76 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. तरी 43.23 लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. मागील वर्षी 513.85 वरुन यंदाच्या वर्षी 469.41 लाख टन उसाचे गाळप राज्यात झाले. 50.10 लाख टनाच्या तुलनेत 39.90 लाख टन साखर उत्पादन झाली.
गुजरातमध्ये 17 कारखान्यांनी 87.38 लाख टनाच्या तुलनेत81.19 लाख टन उसाचे गाळप केले आहे. तर 9 लाख टनाच्या तुलनेत 8.20 लाख टन साखर उत्पादीत केली. रिकव्हरी सरासरी 10.30 वरुन 10.10 टक्क्यांवर आला. मागील वर्षी 9.20 लाख टन साखर उत्पादीत केली होती यंदाच्या वर्षी 8.50 लाख टन सारखेचं उत्पादन घेतले आहे.
हरयाना 14 पैकी 14 कारखाने सुरू होते. 59.79 च्या तुलानेत 54.44 लाख टन उसाचे गाळप केले. 9.70 टक्के वरुन 9 टक्क्यावर आली. मागील वर्षी पेक्षा 40 हजार टन साखरेचं कमी उत्पादन झाले. यंदाच्या वर्षी 5.50 लाख टन साखर उत्पादित झाली. मध्यप्रदेशात 20 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. 52.36 लाख टनाच्या तुलनेत 51.56 लाख टन उसाचे गाळप यंदाच्या वर्षी झाले. मागील वर्षी 5.20 तर यंदा 5 लाख टन साखर उत्पादीत झाली. पंजाबमध्ये 16 पैकी 15 कारखाने सुरू होते. 61.18 लाख टन गाळप करुन सहा लाख टन सारखेचं उत्पादन घेतले. सरासरी उतारा 8.70 टक्के राहिला. तामिळनाडूत 30 कारखान्यांनी50 लाख टन उसाचे गाळप केले. मागील वर्षी 87 लाख टन उस गाळप झाला होता.10.75 लाख टनाच्या तुलनेत यंदा 7.50 लाख टन साखरेचं उत्पादन झाले. आंध्रप्रदेश, बिहार, तेलंगाणा, उत्तराखंडासह इतर राज्यात 33 कारखान्यापैकी 29 कारखान्यांचा गळीत हंगाम घेतला. 73.97 लाख टन उसाचे गाळप करुन 7.20 लाख साखर उत्पादित केली.
- देशात 60 लाख टनांची तुट शक्य
देशात उत्तर प्रदेश (122), महाराष्ट्र (207) आणि कर्नाटक (79) ही तीन राज्य साखर उत्पादनात अव्वल आहेत. 535पैकी 404 कारखाने या तीन राज्यात आहेत. 212.70 लाख टन साखर उत्पादन केले. मागील वर्षी 266. 85 लाख टन साखर उत्पादीत केली होती. महाराष्ट्रात 30 लाख टन तर उत्तर प्रदेशात 12.65 तसेच कर्नाटकात 11.5 लाख टन सारखेचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. देशात 54.10 लाख टन सारखेचं कमी उत्पादन या तीन राज्यातून होणार आहे. संपूर्ण देशात 60 लाख टन सारखेचे कमी उत्पादन होण्याचा अनुमान आहे.
- दृष्टीक्षेप
देशभरात 533 कारखाने सुरू असून 420 कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. 2981.04 च्या तुलनेत 2653.26 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. म्हणजेच 327.78 लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. साखर उत्पादन पाहता, मागील वर्षी 319 लाख टनावरुन 259 लाख टनावर घसरले आहे. तब्बल 60 लाख टन म्हणजेच 18.81 टक्के साखरेचं उत्पादन कमी होणार आहे. उतारा 10.26 टक्क्यांवरुन 9.30 टक्क्यांवर आला आहे. एकूण साखर उत्पादनात या तीन राज्यांचा 83 टक्के इतका आहे. संपूर्ण देशात या तीन राज्यात मिळून उसाचे गाळप आणि साखर उत्पादन दोन्ही सरासरी 87 टक्के आणि रिकव्हरी 8.50 टक्के आहे.








