खा. राहुल शेवाळे यांच्या पत्नीचा खुलासा
मुंबई : खासदार राहूल शेवाळे यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशलमिडीयावर फिरत आहे. या विरोधात आता ऱाहूल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे उतरल्या आहेत. त्यांनी शेवाले यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविरोधात निवेदन काढले आहे. या निवेदनात त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना गेले वर्षभर नाहक त्रास होत असून याविरोधात मी केंद्रिय महिला आयोगाकडे जाणार आहे असे स्पष्ट केले.
आपल्या निवेदनात कामिनी शेवाळे म्हणल्या कि, “सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. सदर महीलेविरोधात गेल्या वर्षीच आम्ही सायबर पोलीसांत तक्रार दाखल केली होती. माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाने सदर महीलेविरोधात साकीनाका पोलिसांकडून एफआयआर नोंदविण्यात आला आहे.”
निवेदनात कामिनी शेवाळे म्हणतात, “सदर महिला गेल्या वर्षभरापासून मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत आहे. याविरोधात मी सर्व पुराव्यानिशी स्वतः गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून या महीलेविरोधात एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आला आहे. या महीलेकडून मला आणि माझ्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबवण्यासाठी पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागितली आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या मानसिक त्रासाला कारणीभूत असलेल्या या महीलेविरोधात मी स्वतः केंद्रीय महिला आयोगाकडे देखील लवकरच तक्रार दाखल करणार आहे.” अस त्यांनी स्पष्ट केले. आमचा न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर विश्वास असून आम्हाला या प्रकरणात न्याय मिळेल, याची मला खात्री आहे असा विश्वासही व्यक्त केला.