सागरी यात्रेत सुधीर सावंत यांचे पारंपरिक मच्छीमारांना आश्वासन
मालवण – प्रतिनिधी
जिल्ह्यातील आऊटबोर्ड आणि इनबोर्ड इंजिन गिलनेटधारक मच्छीमारांना ५० टक्के अनुदानातून जाळी खरेदी योजनेचा लाभ राज्य शासनाने द्यावा अशी मागणी सागरी यात्रेत करण्यात आली. माजी खासदार सुधीर सावंत यांना याविषयीचे निवेदन श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेकडून निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधू आणि गिलनेटधारकांना दिलासा देऊ असे आश्वासन सावंत यांनी दिले.









