प्रतिनिधी /म्हापसा
राज्यभर गाजलेल्या सोनाली फोगट खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुखविंदर सिंग व सुधीर सांगवान या दोघां संशयित आरोपींना येथील न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता या दोघांनाही पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या दोघांही संशयित आरोपींनी हणजूण येथील कर्लीज बार ऍण्ड रेस्टॉरंटमध्ये बाटलीत मिश्रीत करून रासायनीक अमली पदार्थ पाजला होता. त्यामुळे सोनाली बेशुद्ध होऊन अखेर तिचा मृत्यू झाला होता. प्रथम हा मृत्यू म्हणजे हृदयविकाराचा प्रकार असल्याचे सुचित केले होते मात्र सोनाली ही अभिनेत्री तसेच भाजपच्या नेत्या असल्याने हे प्रकरण राज्यातच नव्हे तर देशभर गाजले होते. सोनालीचे बंधू गोव्यात आल्यावर आपल्या बहिणीचा हा घातपात असून खून केल्याचा आरोप केल्यावर हे प्रकरण देशभर बरेच गाजले होते. शवचिकित्सा अहवालात हे प्रकरण खुनाचे म्हटल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता.









