Maharashtra Monsoon Session 2022 : विधिमंडळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. कुपोषणाने आदिवासी भागात बालकांचा मृत्यू झाला. यावरून जोरदार खडाजंगी सत्ताधारी आणि विरोधकात झाली. कुपोषमामुळे एकाही बालकाचा मृत्यू झाला नाही. इतर आजारांनी बालकांचा मृत्यू झाला आहे.असं वक्तव्य मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं.यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तर ‘लाज वाटली पाहिजे’ या वक्त्यांवरून मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आक्रमक झाले.
गेली ७५ वर्ष आदिवासी समाजात बदल झालेला पाहायला मिळत नाही. आदिवासींना आजही सुविधा मिळत नाहीत. कुपोषण नाही असं बोलणं चुकीचं आहे. जेव्हा राजकारणी दौऱ्यावर जातात तेव्हा फक्त प्रशासकीय यंत्रणा हलते. खरंतर राजकारणी म्हणून आपल्याला ‘लाज वाटायला पाहिजे’. आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी तसेच कुपोषण थांबवण्यासाठी एकत्रित समिती स्थापन करावी अशी मागणी केली. तसेच आदिवासी समाजाला न्याय देणार का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपस्थित केला. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप नोंदवला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांबद्दल लाज वाटली पाहिजे हे कसे बोलता. संसदेच्या काही प्रथा-परंपरा आहेत. भावनेच्या भरात जे वक्तव्य केलं. ‘लाज वाटली पाहिजे’ हे असंसदीय शब्दाच्या यादीत आहे. म्हणून त्यांना ताकीद द्या. किंवा त्यांनी शब्द मागे घ्यावा असेही ते म्हणाले.
हेही वाचा- माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश
यावर माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, आदिवासी मंत्र्यांनी विधानसभेत असंसदीय वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात ते बोलत आहेत. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.आदिवासी मंत्र्यांच संरक्षण वनमंत्री करत आहेत. आकडे आरोग्यमंत्री देत आहेत. त्यांमुळे तुम्ही वक्तव्य मागे घ्या असेही जयंत पाटील म्हणाले.
Previous Articleअभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे
Next Article उत्तर कर्नाटकात नॅशनल लॉ कॉलेज सुरू करा








