विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ५५ टक्के मतं मिळवत सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार डबाले यांनी पहिल्या पसंतीच्या मतमोजणीपासूनच आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राखली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे भाजप पुरस्कृत नागो गाणार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, दोघांच्या मतांमधील अंतर बरेच होते. त्यामुळे मविआचा नागपुरात बाजी मारली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








