सातार्डा –
कवठणी – बाळोजीवाडी येथील सुरज सुरेश म्हालदार ( 31 ) या तरुणाचे सोमवारी सायंकाळी आकस्मात निधन झाले. सुरज म्हालदार याच्या अकाली निधनामुळे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.सुरज म्हालदार हा गोवा – कोलवाळ येथील बिनानी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीला होता. सोमवारी सूरजने कामावर एक दिवसाची सुट्टी घेतली होती.सोमवारी संध्याकाळी क्रिकेट खेळताना एक षटक टाकल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर सोबतच्या मित्रांनी सुरजला डॉ. रेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना सुरजचे आकस्मात निधन झाले. त्याच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









